ब्लॉग

वैशाख पौर्णिमा/बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय?

पाली भाषेत “वेसाक” आणि संस्कृत भाषेत “वैशाख” असे म्हटले जाते. तसेच जगभरात वेगवेगळ्या देशात बुद्ध पौर्णिमेला/वैशाख पौर्णिमेला वेगवेगळ्या नावाने उच्चार करतात. परंतु त्याचा अर्थ एकच होतो, म्हणजेच “भगवान बुद्धाचा वाढदिवस” आणि “बुद्ध पौर्णिमा”

बुद्ध पौर्णिमा/वैशाख पौर्णिमा हा जगभरात उत्साहात साजरा का केला जातो? या दिवशी नेमके काय घडले? बुद्धाचा जन्म हे तर मुख्य कारण आहेच त्याच बरोबर याच वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गोतमाला संबोधी प्राप्त झाली आणि ते “बुद्ध” म्हणून धम्माचा प्रसार केला, त्याच बरोबर याच दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला तथागत बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले. या तीनही महत्वपूर्ण घटना वैशाख पौर्णिमेलाच घडल्या मुळे वैशाख पौर्णिमेला अधिक महत्व आहे.

जगभरात वैशाख पौर्णिमेला “वेसाक (Vesak)” म्हणून ओळखतात. सिद्धार्थ गोतम यांचा जन्म नेपाळ देशातील लुम्बिनी वनात महामाया यांच्या पोटी झाला. नेपाळ पासून आशिया खंडातील सर्व देशात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरा केला जातो. त्याचबरोबर युरिपीयन मधील अनेक देशात बुद्ध पौर्णिमा/वैशाख पौर्णिमा साजरा केला जातो.

भारतात वैशाख/बुद्ध पौर्णिमा मे महिन्यात असते. भारतात महाबोधी बौद्ध विहार आणि नेपाळ देशातील लुम्बिनी मायादेवी बौद्ध विहार (बुद्धाचे जन्म स्थान) या दोन ठिकाणी जगभरातील बौद्ध भिक्खू आणि बौद्ध उपासक येऊन बुद्ध पौर्णिमा साजरी करतात.

मे महिन्याच्या १ तारखेपासून ३१ तारखेपर्यंत वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या तारखेनुसार (पूर्ण चंद्र दिसल्यावर) बुद्ध/वैशाख पौर्णिमा साजरी केली जाते.

कोणकोणत्या देशात बुद्ध पौर्णिमा साजरी होते आणि त्यास त्यांच्या भाषेत काय संबोधतात हे जाणून घेऊ नेपाळ, भारत, तिबेट, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, भूतान, लाओस, सिंगापोर,हॉंगकॉंग, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपिन्स, चीन, कंबोडिया, मंगोलिया, मलेशिया, बांगलादेश, तैवान,जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, शांघाय इत्यादी आशियाई देशात बुद्ध/वैशाख पौर्णिमा साजरी केली जाते.

इतर देशात, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, इंग्लंड, कॅनडा, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इटली, फ्रान्स,ऑस्ट्रिया, रशिया, पोलंड इत्यादी देशात सुद्धा वैशाख पौर्णिमा साजरी केली जाते.

अनिरुद्ध गायकवाड, नांदेड

One Reply to “वैशाख पौर्णिमा/बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय?

Comments are closed.