आपल्या स्वरूपाचे यथाभूत (जसे आहे तसेच) दर्शन करण्याला विपश्यना (किंवा विदर्शना) म्हणतात. सतिपठ्ठान म्हणजे सतत जागरूक राहणे. निरंतर अप्रभावी राहून स्मृतिभाव केल्याने हळूहळू साधकाची अंतर्दृष्टी किंवा प्रज्ञाचक्ष उघडते. त्या प्रज्ञाचक्षुद्वारे साधक नामरूपाचे ( पंचस्कंधाचे ) यथाभूत दुःख अनात्म स्वभावाचे दर्शन करू लागतो. येणेप्रमाणे आपल्या स्वरूपाच्या यथाभूत दर्शन करण्याला विपश्यना म्हणतात. तिच्या वर्धापन करण्याला सतिपटठ्ठान विपश्यना भावना म्हणतात. ही तत्काळ फळदायी आहे, इथेच तिचे फळ प्राप्त होते. ही भावना निर्वाणापर्यंत पोचविणार आहे आणि साधक तिचा अभ्यास करून येथेच ( या पृथ्वीवरच ) स्वत:च साक्षात्कार करू शकतो.
आपल्या स्वतःच्या शरीराच्या आत आंतर्मुख होऊन या शरीरास, चित्तास आणि चितवृत्तींना तसेच चारही महाभूतांना त्यांच्या गुणधर्म स्वभावानुसार जाणणे व अनुभव करणे की, हे सर्व तरंग तरंग आहेत, हे सर्व केवळ प्रवाहमात्र आहेत आणि या प्रकारे त्यांच्या जुन्याच्या वस्तुस्थितीला जाणून घेऊन त्यांच्या बंधनापासून मुक्त राहणे, हिलाच’ विपश्यना साधना ‘म्हणतात आणि हाच मंगलपथ आहे. विपश्यना भावनेसाठी-
१. शीलानुसार वर्तन ठेवने
२.. समाधीमध्ये चित्तास दृढ करून
३. प्रज्ञेनुसार अनित्य, अनात्म आणि दुःखबोधासहित, जागृत राहून, समताभाव कायम राखून, आपल्या देहामध्ये संवेदनेच्या मार्गे, सहज दिसणाऱ्या सत्यापासून सूक्ष्म सत्यापर्यंत अनुभूतिपूर्वक दर्शन घ्यावे लागते.
विपश्यना म्हणजे विशेषकरून पाहणे, अंतर्मुखी होऊन स्थूल सत्याचे विभाजन करीत करीत सूक्ष्मतम सत्यापर्यंत पोहोचणे, प्रज्ञेचे कर्मस्थान, चित्तशुद्धीचा मार्ग, संचित संस्कारांनी उर्डीण होऊन बाहेर निघून येणे) त्या संस्कारांची निर्जरा (शुद्ध) करण्याची भावना. आपले विकार म्हणजे संचित कर्मसंस्कारांच्या गाठीदेखील तरंगांच्या पुंजमात्रच आहेत. त्यांना जर उकलता आले तर या संस्कारांची निर्जरा होऊन आपण दुःखापासून मुक्ती मिळवू शकतो. निपश्यना साधना हाच अभ्यास करविते.
संदर्भ : (बौद्ध धम्म जिज्ञासा)
नमो बुद्धाय…🙏
विपश्यने विषयी अतिशय मार्मिक भाषेत व्याख्या मांडली आहे या पेक्षा चांगली भाषा असू शकत नाही.
अजून अधिक उकलन होणे अपेक्षित आहे जेणेकरून सर्वसामान्यांना विपश्यना सहज अवगत होऊन त्याचा प्रसार होईल हीच मनापासून अपेक्षा आहे.
नमो बुद्धाय…🙏
नमो बुद्धा य खूप चांगली माहिती आहे पण ते रोज रोज माणसांन पर्यंत पोहचवणे हे आपली कामे आहेत
खुप छान माहिती मिळाली जय भीम नमो बुध्दाया
Khupach mahatvachi Ani dhammachi mahiti milali
Namo buddhay and jaybhim
Sir