बातम्या

देशातील सर्वात उंच (65 फूट) अशोकस्तंभाचे नांदेडमध्ये काम सुरु..!

नांदेड जिल्ह्यातील बावरीनगर दाभड येथे भारतातील सर्वात उंच अशोक स्तंभ निर्मिती कार्य सुरु आहे. ज्याची उंची जमिनी पासून 65 फूट आहे. ह्या स्तंभाचे निर्मिती कार्यास 2012 पासून सुरवात झाली आहे.

या अशोक स्तंभासाठी लागणारा दगड मध्यप्रदेशातून आणला असून व अशोक स्तंभ तयार करण्यासाठी राजस्थान येथील कारागीर स्वतःचे कला कौशल्य वापरत भारतात सर्वोत्तम अशोकस्तंभ निर्मिती करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

हा अशोक स्तंभ महाराष्ट्रातील वैभवात नक्कीच भर घालेल हे त्याची रचना आणि भव्यता पाहून लक्षात येते. आज स्तंभाचे काम पूर्णत्वात आल्यात जमा आहे. त्याच्या सौन्दर्यासाठी त्याच्या चहुबाजूने कारंजे व बगीचा निर्मिती कार्य आगामी काळात होणार असल्याचं सांगण्यात आला आहे.

(छायाचित्र साभार : प्रशिक गायकवाड, नांदेड)